प्रवेश प्रक्रिया तत्काळ थांबवावी ; सकल मराठा समाजाची मागणी 

admission process should be stopped diamond maratha community
admission process should be stopped diamond maratha community
Updated on

कोल्हापूर - मराठा समाजाच्या शैक्षणिक प्रवेशासंदर्भात अधीसंख्य जागा निर्माण करून प्रवेश देण्यासंदर्भात चर्चा व निर्णय प्रक्रिया सुरू आहे. मात्र, तत्पूर्वीच शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ही प्रक्रिया तातडीने रद्द करावी, अशी मागणी आज सकल मराठा समाजाच्या वतीने शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडे केली. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव विलास नांदवडेकर यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केल्यानंतर ही प्रवेश प्रक्रिया थांबवून ती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सकल मराठा समन्वयक प्रसाद जाधव यांनी दिली. 

"एसईबीसी'अंतर्गत असलेल्या मराठा आरक्षण अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. तेव्हापासून सर्वच स्तरावर भरती प्रक्रिया व प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अनास्था व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर शिष्टमंडळाने आज शिवाजी विद्यापीठ प्रशासनाची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी प्रकाश सरनाईक, प्रमोद सावंत, इनामदार, वैभवराज राजेभोसले, राजेंद्र थोरावडे, राजेंद्र चव्हाण, महादेव आयरेकर, प्रशांत सूर्यवंशी आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. 

हे पण वाचा - गावागावांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध: जानेवारी अखेरीस बिगुल शक्‍य  

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com